Mohammed Shami Wife Hasin Jahan Statement Saam tv news
Sports

Hasin Jahan Statement: 'मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल,पण...'मोहम्मद शमीच्या बायकोने केले विचित्र विधान; Video व्हायरल

Mohammed Shami Wife Hasin Jahan Statement: हसीन जहानने मोहम्मद शमीबद्दल विचित्र विधान केलं आहे.

Ankush Dhavre

Hasin Jahan On Mohammed Shami:

भारतीय संघातील खेळाडू वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहेत. आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ८ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीत भारतीय संघासाठी स्टार ठरतोय. एकीकडे त्याचं कौतुक होत असताना, दुसरीकडे त्याची एक्स वाईफ हसीन जहानने विचित्र विधान केलं आहे.

न्यूज नेशनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हसीन जहाँला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाच्या यशाबद्दल आणि मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारण्यात आली होती. यावर बोलताना ती म्हणाली की,'चांगली गोष्ट आहे की ,तो चांगला खेळतोय. याच कामगिरीच्या बळावर तो संघात कायम राहिल. त्यामुळे आमचे भविष्यही सुरक्षित राहील.'

तसेच ती पुढे म्हणाली की, मी भारतीय संघाला शुभेच्छा देईल, पण शमीला नाही.' हसीन जहाँने केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. चुक शमीची नसून हसीन जहाँची आहे, असं काही युजर्सने कमेंट करत म्हटलं आहे. (Latest sports updates)

या वर्षाच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात हसीन जहाँला दरमहा १ लाख ३० हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहे. हसीन जहाँ आपल्या मुलीसह वेगळी राहते.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ हे दोघेही ६ जून २०१४ रोजी विवाह बंधनात अडकले होते. २०१५ मध्ये शमी कुटुंबात चिमुकलीचं आगमन झालं. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी हसीन जहाँने शमीवर वैवाहिक बलात्कार, व्यभिचार, मॅच फिक्सिंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi instagram video : PM मोदींनी पोस्ट केला नवा व्हिडिओ; संपूर्ण देशाला केलं मोठं आवाहन

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

SCROLL FOR NEXT