jasprit bumrah Saam TV
क्रीडा

Team India : टी20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार? समोर आलं 'या' खेळाडूचं नाव

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : टीम इंडियाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. यॉर्कर चेंडूने दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा बुमराह वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये नसल्याने टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.

बुमराहच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी दिली जाणार, याबाबत बीसीसीआयने (BCCI) अजूनही अधिकृत घोषणा केली नाहीय. परंतु, बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागेवर मोहम्मद शमी टी-20 वर्ल्डकप खेळू शकतो. शमी पुढील दोन-तीन दिवसात ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Indian Cricket Team latest News Update)

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवाना गोलंदाज जसप्रीत बुमराहचा पाठीच्या दुखापतीमुळं वर्ल्डकपमध्ये सहभाग नसणार आहे. बुमराहच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी मिळणार? असा सवाल गेल्या काही दिवसापासून क्रिकेटविश्वात घिरट्या घालत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी टी-20 वर्ल्डकप 2022 साठी टीम इंडियात बुमराहच्या जागेवर खेळू शकतो. जेव्हा वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती, त्यावेळी शमीला स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवडलं होतं.

सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी फिट झाला, तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जावू शकतं. तो पुढील आठवड्यात टीमसोबत जोडला जाणार आहे. शमीने गेल्या काही काळापासून मोठी टुर्नामेंट खेळली नाहीय. त्यामुळे त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार, अशी शक्यता आहे. परंतु, शमीचा अनुभव पाहता आयसीसी इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासीठी तो प्रबळ दावेदार आहे. शमी टी-20 वर्ल्डकप 2021 मध्येही टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये होता.

मोहम्मद शमीला कोरोना

दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर स्टॅंडबाय खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाण्याची आशा आहे. मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेसाठी निवड केली होती. परंतु, शमी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला संघातून बाहेर पडावं लागलं होतं. शमी आता कोरोनामुक्त झाला आहे.

शमीचा दांडगा अनुभव कामी येणार?

मोहम्मद शमीच्या फॉर्मबद्दल टीम इंडियाला चिंता नाहीय. कारण, इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत बुमराहने चमकदार कामगिरी केली होती. त्याचसोबत आयपीएल 2022 मध्येही गुजरात टायटन्ससाठी शमीने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे मोठ्या टुर्नामेंटमध्ये शमीच्या अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होऊ शकतो.

शमीचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड

32 वर्षीय मोहम्मद शमीने आतापर्यंत 60 टेस्ट, 82 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर 216 टेस्ट विकेट्स, 152 वनडे विकेट्स आणि 18 टी-20 विकेट्स आहेत. शमीची टेस्टमध्ये 27.45 एवढी सरासरी आहे. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शमी 25.72 च्या सरासरीनं विकेट्स घेतो.तर टी-20 आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सरासरी 31.55 एवढी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT