India vs New Zealand semi final Twitter
Sports

India vs New Zealand Semi final: 'शमी'फायनल! एकट्या मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला केलं गारद, ७ विकेट घेत रचला इतिहास

India vs New Zealand semi final: मोहम्मद शमीने गोलंदाजी करत न्यूझीलंडचे सात गडी बाद केले. शमीने सात गडी बाद करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

Vishal Gangurde

Mohammed Shami Takes Seven Wicket:

विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये हाय व्हॉल्टेज सामना झाला. अतितटीच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे सात गडी ढेर झाले. मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या सात फलदाजांना माघारी धाडलं. शमीने सात गडी बाद करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतानं न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. (Latest Marathi News)

मोहम्मद शमीने विश्वचषकात जबरदस्त आणि विक्रमी गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीला स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, शमीला नंतरच्या काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

संघात स्थान मिळाल्यानंतर शमीने संधीचं सोनं केलं. शमीने धमाकेदार गोलंदाजी करत पुढील सामन्यांमध्येही संघातील स्थान पक्क केलं. विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात ७ गडी बाद करणारा मोहम्मद शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शमीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना भेदक मारा करत अनेक विक्रम नावावर केले आहेत. शमी भारताच्या वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी गोलंदाजी ठरला आहे. त्याचबरोबर शमी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाजही ठरला आहे.

शमीने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाच गडी बाद करण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्याचबरोबर विश्वचषकात शमी सर्वाधिक जलद ५० गडी बाद करणारा गोलंदाज देखील ठरला आहे.

शमीची विक्रमी गोलंदाजी

शमीने सामन्यात ५७ धावा देऊन ७ गडी बाद केले. विश्वचषकात याआधी सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम गॅरी गिल्मरच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या गॅरीने इंग्लंडविरुद्ध १४ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्याचबरोबर शमी या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच आजच्या सामन्यासाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT