New zealand vs Afghanistan twitter
क्रीडा

NZ vs AFG, Playing XI: इंग्लंडनंतर आता न्यूझीलंडचा नंबर! चेन्नईत हा खेळाडू अफगाणिस्तानसाठी ठरणार ट्रम्प कार्ड

New zealand vs Afghanistan: पाहा कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Ankush Dhavre

New zealand vs Afghanistan Playing 11 Prediction:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ दमदार फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळाले आहे. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानने २०१९ स्पर्धेतील चॅम्पियन इंग्लंडला धुळ चारली आहे. दिल्लीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर ६९ धावांनी विजय मिळवला होता.

हा वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील अफगाणिस्तानचा केवळ दुसराच विजय होता. आता अफगाणिस्तानचा संघ उपविजेत्या न्यूझीलंड संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे.

इंग्लंडचा पराभव केला असला तरी देखील न्यूझीलंडविरूद्धचं आव्हान सोपं नसणार आहे. कारण न्यूझीलंडचा संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या ३ पैकी ३ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

हा सामना चेपॉकच्या मैदानावर होणार असल्याने अफगाणिस्तानच्या दिशेने झुकतं माप असणार आहे, कारण ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

चेपॉकच्या खेळपट्टीवर राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबीची तिकडी न्यूझीलंडसाठी घातक ठरू शकते. मात्र मोहम्मद नबी अफगाणिस्तानसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. कारण, न्यूझीलंड संघात डाव्या हाताच्या फलंदाजांची भरमार आहे. त्यामुळे त्याचे फिरते चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. (Latest sports updates)

या फलंदाजांच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर..

अफगाणिस्तानची फलंदाजी इब्राहीम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज आणि रहमत शाहवर अवलंबुन असणार आहे. या तिघांनी २०२१ पासून अफगाणिस्तान संघासाठी वनडेत ५२.७९ टक्के धावा केल्या आहेत. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली होती. तर इक्रम अलिखीलने ५८ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

केन विलियम्सनच्या जागी खेळणार हा फलंदाज..

न्यूझीलंड संघात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. केन विलियम्सनच्या जागी विल यंगला संधी दिली जाऊ शकते. गेल्या सामन्यात केन विलियम्सनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो येणाऱ्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही.

या सामन्यासाठी अशी असू शकते अफगाणिस्तानची प्लेइंग ११:

रहमानुल्लाह गुरबाज,इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इकराम अलिखील (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजहलक फारूकी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT