Mitchell Starc X
Sports

Mitchell Starc : एक ओव्हर, ४ रिव्ह्यू… सलग ३ विकेट्स पडल्या, तरीही मिचेल स्टार्कला 'हॅटट्रिक' का मिळाली नाही?

DC VS KKR : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना सुरु आहे. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने कोलकाताच्या फलंदाजांना २०४ धावांवर रोखले. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा पाहायला मिळाला.

Yash Shirke

DC VS KKR IPL 2025 : दिल्ली विरुद्ध कोलकाता या सामन्यामध्ये कोलकाताने प्रथम फलंदाजी केली. कोलकाताच्या फलंदाजांनी २० ओव्हर्समध्ये २०४ धावा केल्या. इनिंग्सच्या शेवटी मिचेल स्टार्कने गोलंदाजी केली. त्या ओव्हरमध्ये सलग ३ विकेट्स पडल्या. पण तरीही मिचेल स्टार्कला हॅटट्रिक मिळाली नाही. याशिवाय ओव्हरमध्ये ४ रिव्ह्यू देखील घेण्यात आले. दुश्मंता चमीराने उत्कृष्ट कॅच घेतला. मैदानात फुलऑन ड्रामा पाहायला मिळाला.

सलग ३ विकेट्स पडूनही मिचेल स्टार्कला हॅटट्रिक का मिळाली नाही?

शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेलने कडक षटकार ठोकला. दुसरा चेंडू वाइडला गेला. पुढचा चेंडू लेग बाय झाला. तिसऱ्या चेंडूवर रोवमॅन पॉवेल एलबीडब्लू आउट झाला. चौथ्या चेंडूवर अनुकूल रॉयने शॉट मारला, तो चेंडू स्क्वेअर लेगला असलेल्या दुश्मंता चमीराने पकडला आणि रॉय कॅचआउट झाला. पाचव्या चेंडूवर हर्षित राणाने शॉट मारला, पुढे धाव घेताना आंद्रे रसेल रनआउट झाला. तेव्हा स्टार्कने हर्षित राणासाठी एलबीडब्लूसाठी रिव्ह्यू केला. पण तसे रिप्लेमध्ये दिसले नाही. त्यामुळे आंद्रे रसेलला बाद घोषित करण्यात आले. अशा प्रकारे एका रनआउटमुळे सलग तीन विकेट्स पडूनही मिचेल स्टार्कला हॅटट्रिक मिळाली नाही.

२० ओव्हर्समध्ये कोलकाताच्या खेळाडूंनी २०४ धावा केल्या. अंगकृष रघुवंशी चौथ्या क्रमावर खेळायला आला, एका बाजूला विकेट्स पडत असताना टिकून राहिला. त्याने सर्वाधिक ४४ धावा केल्या. रिंकू सिंहने ३६ धावा करुन मधल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये खेळ सावरला. रहमानुल्लाह गुरबाज आने २१६.६७ च्या स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे २६ धावा, तर सुनील नारायण २७ धावा करुन माघारी परतले.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसल, रोवमॅन पॉवेल, हर्षित राणा, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुश्मंता चमीरा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT