MI vs RCB IPL 2023  saam tv
Sports

MI vs RCB: मुंबईने आरसीबीविरुद्ध उतरवला हुकमी एक्का! विराट, डू प्लेसिसवर रोहितचा जालीम उपाय

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians : या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. कारण या सामन्यात पराभव झाल्यास पुढील वाटचाल कठीण होणार आहे.

Chandrakant Jagtap

IPL 2023: मुंबईत आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (MI Vs RCB) यांच्यात रोमांचक सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा 11वा सामना असल्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. कारण या सामन्यात पराभव झाल्यास पुढील वाटचाल कठीण होणार आहे. या सामन्यात आरसीबीविरोधात विजय मिळवण्यासाठी मुंबईने वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला संघात स्थान दिले आहे.

वानखेडेची खेळपट्टी कोणाच्या बाजूने?

या हंगामात वानखेडेच्या मैदानावर आतापर्यंत ४ सामने खेळवले गेले आहेत, त्यापैकी 3 सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. येथील खेळपट्टी (Wankhede Pitch Report) फलंदाजांसाठी अतिशय चांगली मानली जाते. मुंबईचे हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. कारण येथे बाउन्स आणि पकड चांगली आहे.

गेल्या 5 सामन्यांची स्थिती पाहिली तर हाय स्कोअरिंग सामने झाले आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसही वेगाने धावा करत आहेत. अशा स्थितीत या सामन्यात धावसंख्या 200 च्या वर जाण्याची शक्यता आहे. या मैदानावर राजस्थानविरुद्ध मुंबईने 213 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले.

वानखेडेच्या खेळपट्टीवर पडतो धावांचा पाऊस

आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर एकूण 106 सामने खेळले गेले आहेत आणि फलंदाजांनी येथे अनेक धडाकेबाज खेळी खेळल्या आहेत. 106 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 49 सामने जिंकले असून पाठलाग करणाऱ्या संघाने 57 सामने जिंकले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना, सरासरी धावसंख्या 170 आहे, तर दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या 175 आहे. दोन्ही संघांची फलंदाजी पाहता येथे 200 च्या वर धावसंख्या सहज बनवता येते. आरसीबीची मधल्या फळीची कमकुवतपणा असली तरी गोलंदाजी मुंबईसाठी चिंतेचे कारण आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्माचा फॉर्मही टेन्शन देत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT