MI vs KKR head to head record mumbai indians vs Kolkata knight riders record news in Marathi amd2000 twitter
Sports

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs KKR, Head to Head Record And Pitch Report: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला १० पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत २३ सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला केवळ ९ सामन्यांमध्ये बाजी मारता आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना विजय २०१ धावा ही मुंबई इंडियन्स संघाची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तर २३२ धावा ही मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना कोलकाता नाईट रायडर्सची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

पिच रिपोर्ट..

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. मात्र सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळतो. या मैदानावर धावांचा यशस्वी पाठलाग केला जातो. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

इशान किशन( यष्टिरक्षक) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ( कर्णधार) टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह

कोलकाता नाईट रायडर्स संघाची संभावित प्लेइंग ११

फिल सॉल्ट ( यष्टिरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर ( कर्णधार), आंद्रे रसल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, अनुकूल रॉय, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

NEETचं नियंत्रण थेट PMOकडे, पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचेही NTAच्या कारभारावर ताशेरे

SCROLL FOR NEXT