team india twitter
क्रीडा

IND vs BAN: बांगलादेशची खैर नाय! टी-20 मालिकेत टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू एकटा नडणार

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने बांगलादेशळा धूळ चारत कसोटी मालिका २-० ने खिशात घातली. आता दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या मालिकेत असा एक खेळाडू आहे, जो बांगलादेशवर एकटा भारी पडू शकतो.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज मयांक यादवला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

मयांकला मिळणार संधी

मयांक यादव बांगलादेश संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत तो आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. पहिल्या षटकापासून त्याने रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ताशी १५६.७ किमी चेंडू टाकून सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड नोंदवला होता.

वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध

मयांक यादव हा असा गोलंदाज आहे, जो षटकातील ६ चेंडू ताशी १५० किमीच्या पुढे टाकू शकतो. त्याची ही क्षमता पाहून त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत ताशी १५६.७ किमी गतीने चेंडू टाकून तो चर्चेत आला होता. आता भारतीय संघासाठी तो कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women's T20 World Cup: वर्ल्डकप सामन्यात पेटला नवा वाद! रुमाल पडल्यामुळे फलंदाज राहिली नॉटआऊट; नेमकं काय घडलं?

Viral Video : नवरात्रीपुरते नाही तर इतर वेळी देखील महिलांना सन्मान द्या; तरुणाचा VIDEO व्हायरल

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; ११ लाखात फसवणूक

Shweta Tiwari Birthday: १८ व्या वर्षी लग्न, २७ व्या वर्षी घटस्फोट, 'एव्हरग्रीन' श्वेता तिवारीच्या आयुष्यात काय काय घडलं?

Bopdev Ghat: बोपदेव घाट धोक्याचा! ३ दिवसांत अत्याचाराच्या २ घटना, पुणे पोलीस आहेत कुठे?

SCROLL FOR NEXT