p v sindhu, saina nehwal, malaysia open saam tv
Sports

Malaysia Open : पी.व्ही. सिंधूची पोर्नपावीवर मात, सायना नेहवाल हरली

मंगळवारी भारतीय बॅडमिंटपटूंना संमिश्र यश मिळाले हाेते.

Siddharth Latkar

क्वालाल्मपूर : मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन (Malaysia Open Super 750) स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी (badminton) मंगळवारचा दिवस संमिश्र ठरला हाेता. दरम्यान आज (बुधवारी) झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधू (p v sindhu) हिने प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करुन राेमहर्षक विजय नाेंदविला. दसूरीकडे भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (saina nehwal) हिला पराभवास सामाेरे जावे लागले. (Malaysia Open Super 750 Latest News)

या स्पर्धेत सिंधूने (p v sindhu latest marathi news) उत्कृष्ट कामगिरी करत थायलंडच्या जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या पोर्नपावी चोचुवाँगला (Pornpawee Chochuwong) २१-१३, २१-१७ असे नमविले केले.

लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालचा (saina nehwal latest marathi news) जागतिक क्रमवारीत ३३व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांग (Iris Wang) हिने 37 मिनिटातं 11-21, 17- 21 असा पराभव केला.

सातव्या मानांकित सिंधूने थायलंडच्या 21 वर्षीय फिट्टायापोर्न चैवानशी टक्कर दिली. जो जागतिक ज्युनियर रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर होता आणि बँकॉकमधील उबेर कपमध्ये कांस्यपदक विजेत्या संघाचाही भाग होता.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे नेतृत्व करणार्‍या बी सुमीथ रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांचा रॉबिन टेबलिंग आणि नेदरलँड्सच्या सेलेना पाईक या जाेडीकडून 52 मिनिटांनंतर 15-21, 21-19, 17-21 पराभव झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT