LSG vs PBKS IPL 2024  
Sports

LSG vs PBKS : लखनऊच्या नवाबांनी पंजाबसमोर ठेवलं २०० धावांचं टार्गेट

LSG vs PBKS IPL 2024 : या मोसमातील पहिल्याच सामन्यात लखऊन सुपर जायंट्सला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मोसमातील त्यांचा हा दुसरा सामना आहे.पहिला सामना पंजाब किंग्जने जिंकला होता पण दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Bharat Jadhav

Lucknow Super Giants vs Punjab Kings:

आज आयपीएल २०२४ चा आज ११ व्या सामना खेळाला जात आहे. हा सामना लखनऊ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. लखनऊच्या संघाने १९९ धावा करत पंजाबसमोर २०० धावा पूर्ण करण्याचे आव्हान ठेवलं आहे. क्रुणालने नाबाद ४३ धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने ५४ धावा केल्या.

क्किंटन डी कॉकने निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीमुळे लखनऊच्या नवाबांनी पंजाबसमोर धावांचा डोंगर उभारला. डी कॉकने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या, यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर निकोलस पूरनने २१ चेंडूत ४२ धावा ठोकल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा आहे.

या दोघा तिघांच्या दमदार खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले आहे. हा या स्टेडियमवरील सर्वात मोठी धावसंख्या आहे. लखनऊ सुपर जायंट्सची पंजाबविरुद्ध चमकदार सुरुवात झाली. क्विंटन डी कॉकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. मात्र केएल राहुल केवळ १५ धावा करून बाद झाला. त्यांनंतर निकोलस पूरनने चौकार षटकार लगावत पंजाबच्या गोलंदाजींची धुलाई केली. २१ चेंडूमध्ये त्याने ४२ धावा केल्या त्याला रबाडाने बाद केलं.

लखनऊमध्ये या सत्रातील पहिला सामना होत आहे. लखनऊच्या संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर पंजाबसाठी आजचा हा सामना तिसरा असून यात एक विजय आणि एक पराभव मिळालाय.

लखनऊ सुपर जायंट्स: निकोलस पूरन (कर्णधार), केएल राहुल, क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव आणि एम सिद्धार्थ.

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अचानक Blood Pressure वाढल्यास काय करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती

Khandala Ghat : खंडाळा घाटात भीषण दुर्घटना; ट्रकवरील बांधलेले पाईप घसरले, कार व दुचाकीवर पडल्याने दोघांचा मृत्यू

Navi Mumbai Airport Launching : नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्र्यांनी दाखवलं विमानाचे तिकिट, एअरपोर्ट सुरू होण्याची तारीखही सांगितली

भाजप नेत्याची मध्यरा‍त्री गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवर आलेल्या दोघांनी अंधारात डाव साधला

दुसऱ्यासोबत बायको OYO Hotel मध्ये, अचानक नवऱ्याची झाली एन्ट्री, धांदल उडताच बाल्कनीतून उडी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT