MI vs LSG Match Updates Saam TV
Sports

MI vs LSG Match Updates: लखनऊविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने खेळली मोठी चाल; मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल

MI vs LSG Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिला एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात सुरू झाला आहे.

Satish Daud

MI vs LSG Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिला एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात सुरू झाला आहे. प्ले-ऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनऊच्या संघाला सुरूवातीला फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्माने आपल्या प्लेईंग-११ मध्ये एक मोठा बदल केला आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ मध्ये बाद फेरीचे सामने सुरु झाले आहेत. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर-१ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या पराभवासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेल्या संघाला क्वालिफायर-२ मध्ये आणखी एकदा खेळण्याची संधी मिळते.

आज एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  हे दोन्ही संघ आज ‘करो या मरो’ सामन्यात एकमेकांशी दोन हात करणार आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील जो संघ पराभूत होईल, त्याचा प्रवास इथेच संपणार आहे. याशिवाय जो संघ विजय मिळवेल तो हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससोबत दोन हात करेल.

मात्र, लखनऊ असो की मुंबई, दोन्ही संघांना एलिमिनेटर खेळून चॅम्पियन बनणे सोपे असणार नाही. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली असून ‘प्लेऑफ’मध्ये नाट्यमय प्रवेशही झाला आहे. यामुळे सहाजिकच आत्मविश्वास दुणावला असून याचा फायदा मुंबईला आजच्या सामन्यात होण्याची शक्यता आहे. (Indian Premier League 2023)

दरम्यान, लखनऊविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या प्लेईंग-११ मध्ये एक मोठा बदल केला आहे. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर त्याने कुमार कार्तिकेयच्या जागी हृतिक शोकीनला खेळण्याची संधी दिली आहे. हृतिक शोकीन हा युवा फिरकीपटू असून त्याच्या गोलंदाजीचा फायदा चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर नक्कीच होईल, अशी आशा रोहित शर्माने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे लखनऊने सुद्धा आपल्या प्लेईंग-११ मध्ये एक मोठा बदल केला आहे. त्यांनी क्विंटन डी कॉकला संघात स्थान दिलेलं नाही.

MI vs LSG Eliminator: दोन्ही संघाची प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

इम्पॅक्ट खेळाडू पर्याय: नेहल वढेरा, रमणदीप सिंग, विष्णू विनोद.

लखनऊ सुपर जायंट्स: आयुष बदोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान.

इम्पॅक्ट खेळाडू पर्याय: काइल मेयर्स, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, स्वप्नील सिंग, अमित मिश्रा.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT