lsg vs csk playing XI Prediction lucknow super giants vs chennai super kings playing 11 news amd2000
lsg vs csk playing XI Prediction lucknow super giants vs chennai super kings playing 11 news amd2000 twitter
क्रीडा | IPL

LSG vs CSK, Playing XI: लखनऊसमोर चेन्नईचं आव्हान! कशी असेल दोन्ही संंघांची प्लेइंग ११?

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ ६ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ ६ पैकी ३ सामने जिंकून पाचव्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

कशी असेल लखनऊ सुपर जायंट्स संघाची प्लेइंग ११?

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलची जोडी मैदानावर येऊ शकते. यासह आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पुरन आणि क्रूणान पंड्याला संघात संधी मिळू शकते. तर मोहसिन खान, मयांक यादव, यश ठाकूर, शमार जोसेफ या गोलंदाजांना संघात स्थान दिले जाऊ शकते.

चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार बदल?

चेन्नईचा सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनव्हे हा संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाडची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. तर डॅरील मिशेल, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, समीर रीजवी आणि एमएस धोनी हे फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

लखनऊ सुपर जायंट्स..

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, यश ठाकुर आणि शमर जोसेफ

चेन्नई सुपर किंग्ज..

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, समीर रिजवी, एम धोनी(यष्टिरक्षक), शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पथिराना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Today's Marathi News Live : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

SCROLL FOR NEXT