LSG Catapin KL Rahul gets angry on lucknow super giants team after defeat against delhi capitals amd2000 twitter
Sports

KL Rahul Statement: लखनऊच्या कामगिरीवर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

DC vs LSG, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाला पराभवनाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

आयपीएलचा ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्स संघाला धूळ चारली आहे. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना १९ धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. तर पराभूत झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. दिल्लीचा संघ १४ सामन्यांमध्ये १४ गुणांची कमाई करत प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मात्र त्यांचा नेट रनरेट हा चेन्नई आणि हैदराबादपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे दिल्लीचं प्लेऑफ गाठणं जरा कठीण आहे. दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघासाठीही समीकरण कठीण झालं आहे.

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. लखनऊचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरूद्ध होणार आहे. या सामन्यात मोठा विजय मिळवून लखनऊला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

दरम्यान हा सामना झाल्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, ' मला तरी वाटतं की, ४० षटक खेळपट्टी एकसारखीच होती. आम्ही जेव्हा जॅक फ्रेजरला आऊट केलं त्यावेळी आम्हाला या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा होता. शेवटी शाई होप आणि अभिषेक पोरेलने चांगली फलंदाजी केली. आम्ही शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. आम्ही या धावांचा पाठलाग करायला हवं होतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' संपूर्ण हंगामात इथंच आमची गाडी अडतेय. आम्ही पावरप्लेच्या षटकांमध्ये विकेट्स जाणवतोय. आम्हाला स्टोइनिस आणि पुरनसारखे फिमिशर संघात असताना कधीच चांगली सुरुवात मिळाली नाही. हेच आम्ही या स्थितीत असण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: भेटायला बोलावून तरुणाने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर स्वत:वरही केले वार; हत्याकांडाच्या घटनेने सोलापूर हादरले

Dalimba chutney Recipe : आरोग्यदायी डाळिंबाची आंबट-गोड चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुण्यात सभा

Cold Protection: बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी 'ही' एक चूक करताय, आताच अलर्ट व्हा, अन्यथा...

Nashik Crime : प्रेमाचा भयानक शेवट! काका-पुतण्याने २३ वर्षाच्या रवीचा जीव घेतला; चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण

SCROLL FOR NEXT