Lionel Messi with his father Jorge Messi, who passed away at the age of 68 in Rosario. 
Sports

लिओनेल मेस्सीला पितृशोक, ६८ वर्षी जॉर्ज मेस्सी यांचे निधन

Lionel Messi Father Passes Away: फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी यांचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दीर्घ आजारानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जॉर्ज यांचे निधन झाले.

Bharat Jadhav

  • लिओनेल मेस्सी यांचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले.

  • रोझारियो येथील एका क्लिनिकमध्ये त्यांचे निधन झाल्याची माहिती

  • र्जेंटिनातील वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता त्यांचे निधन झाले.

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना पितृशोक झालाय. त्यांचे वडील जॉर्ज यांचे दीर्घ आजारामुळे त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. मेस्सीचे जन्मगाव असलेल्या रोझारियो येथे त्यांचे निधन झाले. अर्जेंटिनामधील वृत्तांनुसार, एका आजारावर ते उपचार घेत होते, त्यात त्यांचे निधन झाले. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता एका क्लिनिकमध्ये त्यांचे निधन झाले.

मेस्सीचा बालपणीचा क्लब 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'ने शनिवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे या अर्जेंटिनी सुपरस्टारच्या वडिलांच्या निधनाची पुष्टी केली. मेस्सी किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून मात्र अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

क्लबकडून शोक व्यक्त

क्लबने म्हटलंय की, "रोसारियो शहरात वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झालेले जॉर्ज मेस्सी यांना 'क्लब ॲटलेटिको नेवेल्स ओल्ड बॉईज' अत्यंत दुःख आणि शोकाकुल अंतःकरणाने निरोप देत आहे. ते 'लेप्रोसो' (क्लब) चे एक निष्ठावान चाहते आणि व्यावसायिक होते, तसेच अर्जेंटिना राष्ट्रीय संघाचा कर्णधार लिओनेल आंद्रेस मेस्सी यांचे ते वडील होते."

आपली पत्नी सेलिया कुच्चिटिनी हिच्यासोबत, जॉर्ज यांनी सर्वकालीन महान खेळाडूच्या कारकिर्दीला पुढे नेण्यात खंबीर आधार आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावली. मालविनास येथील सुरुवातीच्या काळापासून ते जागतिक फुटबॉलच्या शिखरापर्यंतच्या प्रवासात त्यांनी लिओनेलची साथ दिली. पडद्यामागून त्याला मार्गदर्शन केले. त्याला या रंगांवर प्रेम करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद.

या कठीण काळात संचालक मंडळ, सदस्य, खेळाडू आणि संपूर्ण 'लेप्रोसो' परिवार सेलिया, लिओनेल, रॉड्रिगो, मटियास, मारा सोल आणि त्यांच्या सर्व प्रियजन व निकटवर्तीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कायमचा निरोप, लेप्रोसो." असं क्लबनं आपल्या निवदेनात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT