virat kohli twitter
Sports

ICC Test Ranking: मालिका गमावताच ICC चा टीम इंडियाला दणका! Ranking मध्ये मोठी घसरण; विराट- रोहित टॉप 20 मधून बाहेर

Latest ICC Test Ranking: आयसीसीने कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये विराट आणि रोहितचं मोठं नुकसान झालं आहे.

Ankush Dhavre

ICC Test Ranking News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे .ही मालिका झाल्यानंतर आयसीसीने टेस्ट रँकिंगची घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. तर रिषभ पंतचा चांगलाच फायदा झाला आहे.

जो रुट ऑन टॉप

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही महिन्यांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या बळावर त्याने रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

केन विलियम्सन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र तरीी ८०४ रेटींग पॉईंट्ससह तो अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचाच फलंदाज हॅरी ब्रुक ७७८ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

रिषभ पंतची मोठी झेप

रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. या जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी रिषभने महत्वपूर्ण खेळी करुन संघाचा डाव सावरला. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

तर सलामीला फलंदाजीला येणाऱ्या यशस्वी जयस्वालला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. याचा फटका त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये बसला आहे. तो ७७७ रेटिंग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी घसरला आहे. तर स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानी कायम आहे.

विराट - रोहितची मोठी घसरण

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप राहिलेल्या विराटला रँकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे. तो ६५५ रेटींग पॉईंट्ससह २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचीही मोठी घसरण झाली आहे. रोहित ६२९ रेटींग पॉईंट्ससह २६ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT