Lasith Malinga News: saam tv news
Sports

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगाचे पुनरागमन! IPL 2024 साठी मिळाली मोठी जबाबदारी

Lasith Malinga News: लसिथ मलिंगाचे मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन झालं आहे.

Ankush Dhavre

Lasith Malinga News In Marathi:

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नुकताच शेन बाँडने गोलंदाजी प्रशिक्षक पदावरून माघार घेतली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाची नेमणूक केली आहे.

लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्सची फ्रँचायजी असलेल्या MI न्यूयॉर्क आणि MI केप टाऊन संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय. आता तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला गोलंदाजीचे धडे देताना दिसून येणार आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्स संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी मिळताच लसिथ मलिंगा म्हणाला की,'मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. MI न्यूयॉर्क आणि MI केपटाऊन संघांसोबत माझा प्रवास सुरू आहे. मार्क, पॉली, रोहित शर्मा आणि संपुर्ण संघासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.' (Latest sports updates)

लसिथ मलिंगाची शेन बाँडच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे. शेन बाँडने गेली ९ वर्षे मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या ४ ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. शेन बाँडच्या मार्गदर्शनाखाली खेळताना जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासारखे गोलंदाज घडले आहेत.

लसिथ मलिंगाबद्दल बोलायचं झालं तर, २००८ पासून त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा लसिथ मलिंगाच्या नावे आहे. मलिंगाने १३९ सामन्यांमध्ये ७.१२ च्या इकोनॉमिने १९५ गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT