Lakshya Sen saam tv
Sports

All England Badminton Championship: उपविजेतेपद मिळविणा-या लक्ष्य सेननं जिंकले कराेडाे भारतीयांचे मनं

लक्ष्य सेननं सामना गमावला असला तरी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

बर्मिगहॅम : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील (All England Badminton Championship) अंतिम सामन्यात भारताच्या (India) लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) डेन्मार्कच्या (Denmark) व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने (Victor Axelsen) २१-१०, २१-१५ असा पराभव केला. दरम्यान तब्बल २१ वर्षानंतर भारतीय खेळाडूने या स्पर्धेत (badminton) उपविजेतेपद मिळविल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह क्रीडाप्रेमी (sports) समाज माध्यमातून लक्ष्य सेनवर अभिनंदनाचा वर्षावर करीत आहेत. (lakshya sen latest marathi news)

लक्ष्य सेनने या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केल्याने भारतीय क्रीडाप्रेमींत आनंदाचे वातावरण हाेते. लक्ष्यने हा सामना जिंकून इतिहास रचावा अशी अपेक्षा क्रीडारसिक बाळगून हाेते. परंतु अव्वल दर्जाचा बॅडमिंटनपटू अ‍ॅक्सेलसेनने उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित लक्ष्यचा पराभव केल्याने क्रीडारसिक हळहळले.

या सामन्यात अ‍ॅक्सेलसेनने पहिल्या पासूनच शानदार खेळ करीत पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने दोन गुणांची कमाई केली. परंतु अ‍ॅक्सेलसेनच्या आक्रमक खेळीपुढं त्याचा टिकाव लागला नाही आणि पहिला सेट २१-१० असा हरला.

पहिला सेट २१-१० असा गमावल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. मात्र अ‍ॅक्सेलसेनने लक्ष्यला सर्वोत्तम खेळ करण्यापासून रोखले. हा सेट त्याने २१-१५ असा जिंकत स्पर्धेतील विजेतेपदावर शिक्कामाेर्तब केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT