kuldeep yadav twitter
Sports

IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

Kuldeep Yadav Bowling: या सामन्यात कुलदीप यादवने भन्नाट बॉल टाकला आहे.

Ankush Dhavre

Kuldeep Yadav Bowling:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीपने यादवने टाकलेल्या एका चेंडूची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने एक भन्नाट चेंडू टाकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची दांडी गुल केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी २३० धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच इंग्लंडला मोठे धक्के दिेले. अवघ्या ३९ धावसंख्येवर इंग्लंडचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. इंग्लंडच्या कर्णधाराने जबाबदारी स्विकारत मोईन अलीसोबत मिळून डाव सावरायला सुरुवात केली. दोघांमध्ये १३ धावांची भागीदारी होताच कुलदीप यादवने इंग्लंडला मोठा धक्का दिला.

भारतीय संघाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. त्याने ओव्हर द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला. हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त फिरला आणि जोस बटलरचा मधला स्टम्प उडवून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

भारतीय गोलंदाज चमकले..

या मैदानावर १२ पैकी ९ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकणार असं म्हटलं जात होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत २३० धावांचा यशस्वी बचाव केला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर गडगडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाची धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार; होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने इराणची ३१ जहाजे रोखली

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

SCROLL FOR NEXT