kuldeep yadav record news completed 50 wickets in test cricket india vs england 5th test  twitter
Sports

Kuldeep Yadav Record: मानलं रे भावा! गेल्या १०० वर्षांत कुठल्याच गोलंदाजाला नाही जमलं ते कुलदीप यादवने करुन दाखवलं

India vs England 5th Test: भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

Kuldeep Yadav Record News:

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र इंग्लंडचा हा निर्णय फसला. कारण इंग्लंडचा डाव अवघ्या २१८ धावांवर आटोपला आहे. दरम्यान या डावात ५ गडी बाद करणाऱ्या कुलदीप यादवने असं काही करुन दाखवलं जे गेल्या १०० वर्षात कोणालाच जमलं नव्हतं.

कुलदीप यादवने या डावात ४ गडी बाद केले. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. गेल्या १०० वर्षात सर्वात कमी चेंडू फेकून ५० गडी बाद करणारा कुलदीप यादव हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादवने हा कारनामा १८७१ चेंडू फेकून केला आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २१ डावात ५१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ४० धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Cricket news in marathi)

गेल्या सामन्यात आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, अनिल कुंबळेने सर्वाधिक ६१९ गडी बाद केले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या आर अश्विनने ५०७ गडी बाद केले आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत कपिल देव यांनी कसोटीत ४३४ गडी बाद केले होते.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कुलदीप यादवच्या ५, आर अश्विनच्या ४ आणि रविंद्र जडेजाच्या १ गडी बाद करण्याच्या बळावर इंग्लंडचा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT