Sports

KKR vs LSG: फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यरची वादळी खेळी; लखनऊला पहिल्यांदा दिली मात

आयपीएलच्या २८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. कोलकाता संघाला लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या १६२ धावांचं आव्हान दिलं होतं.

Bharat Jadhav

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants :

केकेआर संघाचा फलंदाज साल्टने आजचा दिवस गोड केला. केकेआरने पहिल्यांदा लखनऊला पराभूत केलंय. आयपीएल २०२४ च्या २८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८ विकेट्सने पराभव केला. फिल साल्टने नाबाद ८९ धावा केल्या. त्याने ४७ चेंडूचा सामना करत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३८ धावांची खेळी केली.(Latest News)

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. आयपीएलच्या इतिहासात कोलकाताने प्रथमच लखनऊला पराभूत केलं. हे सर्व शक्य झालंय फिल साल्टच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे. या विजयासह केकेआरचे ८ गुण झाले असून हा कोलकाता संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने केकेआरला १६२ धावांचे लक्ष्य दिले. लखनऊकडून निकोलस पुरनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. दरम्यान केकेआर संघातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कने कोलकात्यासाठी आर्थिकदृष्ट्या गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २८ धावा देऊन ३ बळी घेतले. स्टार्कशिवाय रसेल चक्रवर्ती, नरेन आणि वैभव अरोरा यांना प्रत्येकी १ बळी मिळाला. आंद्रे रसेलने १ षटक टाकले. त्यात त्याने १६ धावांत १ बळी घेतला.

रमनदीप बनला सुपरमॅन

केकेआरने लखऊनच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. यावेळी केकेआरचा रमनदीप सिंह घेतलेला झेलने सर्वांचे लक्ष वेधलं. रमनदीप सिंहने १ सेकंदापेक्षा कमी रिॲक्शन टाइममध्ये अप्रतिम झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. मिचेल स्टार्कने डावातील ५ वे षटक टाकले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हवेत गेला. बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रमनदीप सिंगने बिबट्यासारखी चपळता दाखवत अप्रतिम झेल घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT