team india twitter
Sports

कसोटीनंतर आता रंगणार T-20 चा थरार! वाचा केव्हा होणार IND vs BAN यांच्यातील पहिला सामना?

India vs Bangladehs T20I Series: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या या मालिकेला केव्हा होणार सुरुवात.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत २- ० ने मालिका खिशात घातली. दरम्यान कसोटी मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमधील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान जाणून घ्या या मालिकेबद्दल सर्वकाही.

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेला केव्हा सुरुवात होणार?

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेला ६ ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर तर मालिकेतील तिसरा सामना १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

असं आहे या मालिकेचं वेळापत्रक

६ ऑक्टोबर- पहिला टी-२० सामना - माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वालियर

९ ऑक्टोबर- दुसरा टी-२० सामना - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

१२ ऑक्टोबर- तिसरा टी-२० सामना - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील सामने किती वाजता सुरु होतील?

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील.

इथे पाहू शकता लाईव्ह

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील सामने स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहेत.

इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील सामने जियो सिनेमावर फ्री मध्ये पाहता येणार आहेत. यासह तुम्ही या सामन्यांचे अपडेट www.saamtv.esakal.com वर लाईव्ह अपडेट्स मिळवू शकता.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई.

बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तंजीद हसन तमीम, परवेज हुसेन इमोन, तोहिद हृदोय, महमूदुल्लाह, लिटन दास, जाकिर अली, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हस, , मेहदी हसन मिराज, मेंहदी हसन,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

SCROLL FOR NEXT