kl rahul  instagram
Sports

KL Rahul New Business: केएल राहुल बनला बिझनेसमन! सुरु केला हा नवा व्यवसाय

KL Rahul News In Marathi: भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने एक नवा व्यवसाय सुरु केला आहे.

Ankush Dhavre

काही दिवसांपूर्वी केएल राहुलची (KL Rahul) एक सोशल मीडिया पोस्ट तुफान चर्चेत आली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर केएल राहुल निवृत्ती घेतो की काय? अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. त्याचे काही फेक पोस्ट व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत मोठी घोषणा केली आहे.

केएल राहुलने शेअर केला व्हिडिओ

भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मेटामॅन या फ्रेगरन्स कंपनीची जाहीरात करताना दिसतोय. मात्र आनंदाची बाब अशी की, क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालणारा केएल राहुल आता बिझनेसमन बनला आहे. केएल राहुल एका प्रसिद्ध कंपनीचा फाऊंडर आहे. ही कंपनी जगप्रसिद्ध परफ्युम्स बनवते. नेटकरीही त्याला नव्या बिझनेससाठी शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

निवृत्तीची पोस्ट व्हायरल

काही दिवसांपूर्वी केएल राहुलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीवर त्याने असं काहीतरी लिहिलं होतं, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली होती. त्याने या पोस्टमध्ये, 'मला काहीतरी घोषणा करायची आहे..'असे लिहिले होते. त्यानंतर केएल राहुल निवृत्ती घेतो की काय? असं म्हटलं जात होतं. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं.

केएल राहुल आणखी एका कारणामुळे तुफान चर्चेत आला होता. आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी केएल राहुल लखनऊ सुपर जांयट्स संघाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या २ हंगांमापासून तो या संघांचं नेतृत्व करतोय. मात्र आगामी हंगामात तो दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent heart attack: शरीरात ही ५ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅकचा आहे धोका

Makeup Tips: उन्हाळ्यात लग्नसराईसाठी १० मिनिटात असा करा ग्लॅमरस मेकअप, घाम आल्यावरही मेकअप तसाच राहिलं

Tamil Nadu Politics : थलापती विजय यांच्यासमोर पेच वाढला; राज्यपालांनी दुसऱ्यांदा माघारी धाडलं, TVK समोर पर्याय काय?

Maharashtra News Live Update: वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

उल्हासनगर रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर राडा; डॉक्टरांवर हल्ला अन् हॉस्पिटलची तोडफोड|VIDEO

SCROLL FOR NEXT