KKR vs SRH, IPL 2023 Match  SRH/ Twitter
Sports

KKR vs SRH, IPL 2023 : कोलकाताला रोखण्यासाठी हैदराबादची नवी चाल; मॅचविनर खेळाडूला दिलं संघात स्थान

KKR vs SRH Match : कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे हैदराबादने सुद्धा या सामन्यासाठी चांगलीच तयारी केली आहे.

Satish Daud

KKR vs SRH, IPL 2023 Match : आयपीएलमध्ये आज कोलकता नाईट राईडर्स आणि सनराईज हैदराबादचा संघ आमने-सामने येणार आहे. ईडन गार्डनवर हा सामना होत असल्याने कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे हैदराबादने सुद्धा या सामन्यासाठी चांगलीच तयारी केली असून कोलकाताची धुलाई करण्यासाठी मॅचविनर खेळाडूला संघात स्थान दिलं आहे. (Breaking Marathi News)

कोलकाता नाईट राईडर्सने ( कोणताही बदल केलेला नाही. कर्णधार नितीश राणाने मागच्या सामन्यातील विजयी संघ तसाच कायम ठेवला आहे. दुसरीकडे हैदराबादने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. वाशिंग्टन सुंदरच्या जागी  (IPL 2023) अष्टपैलू अभिषेक शर्माला स्थान देण्यात आलं आहे. अभिषेक हा डावखुरा फलंदाज असून त्याच्यात पावरप्लेमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. याशिवाय तो उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज सुद्धा आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेला रिंकू सिंग आज त्याच्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. रिंकूने गुजरातविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूंवर सलग ५ षटकार ठोकत केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला होता. (Latest sports updates)

कोलकात्याच्या चाहत्यांना आज पुन्हा रिंकूच्या विस्फोटक खेळीची आशा असेल. त्यासाठी रिंकू सिंगला फलंदाजीत बढती सुद्धा मिळणार असल्याची शक्यता आहे. रिंकूवर आपली लय कायम ठेवण्याचे दडपण असेल, दुसरीकडे हैदराबाद संघाला रिंकूच्या आक्रमक फटकेबाजीची चिंता असेल.

अशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग-११


कोलकाता नाईट रायडर्सः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा.

सब्स्टिट्यूट्स: मनदीप सिंग, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया.

सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

सब्स्टिट्यूट्स: अब्दुल समद, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, वॉशिंग्टन सुंदर.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT