KKR vs SRH IPL Final 2024  twitter
Sports

KKR vs SRH, IPL 2024 Final Toss: फायनलमध्ये हैदराबादने जिंकला टॉस; KKR ला गोलंदाजीचं आमंत्रण; पाहा प्लेइंग ११

KKR vs SRH Final, Toss Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलच्या सामन्याला प्रारंभ झाला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी एन्ट्री केली आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत २७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने १८ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबादला केवळ ९ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर सनरायझर्स हैदाराबादने १ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स-

सुनील नरेन, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क ,वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

केकेआर इम्पॅक्ट प्लेअर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद-

ट्रॅव्हिस हेड, भिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन

इम्पॅक्ट प्लेअर्स -अब्दुल समद, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT