Rinku singh  saam tv news
Sports

Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

Rinku Singh On His IPL Salary: रिंकू सिंग टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी त्याने आपल्या मानधनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत रिंकू सिंगला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तरीदेखील कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं आहे. रिंकू सिंगला या हंगामात फलंदाजीची संधी मिळाली नसली तरीदेखील गेल्या काही महिन्यातील कामगिरी पाहता, त्याची टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तो टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. दरम्यान या स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

रिंकू सिंगला आयपीएल स्पर्धेतून मिळणाऱ्या मानधनाबाबत विचारलं असता तो म्हणाला की, ' ५५ लाख माझ्यासाठी खूप जास्त आहे. ज्यावेळी मी मोठा होत होतो त्यावेळी मी १०- १५ रुपये कसा कमवू शकेल याचाच विचार करायचो. मात्र आता माझा पगार ५५ लाख रुपये आहे. जे माझ्यासाठी खूप जास्त आहे. माझ्या मते, देव आपल्याला जितकं देतो,त्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे.' रिंकू सिंगला ५५ लाखांची बोली लावत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचं असं म्हणणं आहे की, रिंकू सिंगला कोट्यवधी रुपये मिळायला हवे. रिंकूचा खेळ पाहता ५५ लाख रुपये ही खूप कमी किंमत आहे.

यासह रिंकू सिंगने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबतही भाष्य केलं आहे. तो म्हणाला की,' रोहित शर्माला युवा खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. तो एक उत्कृष्ठ कर्णधार आहे, हे साऱ्या जगाला माहित आहे. त्याला नेहमी हेच वाटतं की, युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करावी.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavhachi Kheer Recipe: गोडाचा पदार्थ खायचाय? मग बनवा गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात बुलडोझर राज; निदाला आधार, मतीनचं घर जमीनदोस्त

Maharashtra News Live Update: धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयाने दिला दोन दिवसाचा ट्रांजिट रिमांड

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

SCROLL FOR NEXT