KKR vs delhi capitals  Saan tv
Sports

KKR चा सलग चौथा विजय; दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चारली धूळ

KKR vs delhi capitals : KKR चा सलग चौथा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर धूळ चारली आहे.

Vishal Gangurde

इंडियन प्रीमीयर लीगमध्ये केकेआरकडून दिल्लीचा पराभव

केकेआरने ८ विकेटने चारली दिल्ली धूळ

केकेआरने मिळवला सलग चौथा विजय

इंडियन प्रीमीयर लीगमध्ये शुक्रवारी ५१ वा सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ८ विकेटने धूळ चारली. केकेआरला विजयासाठी १४३ धावांची गरज होती. केकेआरने अवघ्या १४.२ षटकात आव्हान पूर्ण करत दिल्लीचा पराभव केला.

फिन एलनने ४७ चेंडूत नाबाद १०० धावा पूर्ण केल्या. यात १० षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. कोलकाता नाइट रायडर्स सलग चौथा विजय मिळवला. केकेआरच्या फिन एलनचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची कामगिरी खास राहिली नाही. दिल्ली कॅपिटल्सने ११ सामने खेळत ४ सामने जिंकले आहेत. दिल्लीने ८ गुण मिळवले आहेत. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाने १० सामने खेळत ४ सामने जिंकले आहेत. केकेआरने ९ गुण मिळवले आहेत.

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली राहिली नाही. कर्णधार अंजिक्या रहाणेने केवळ १३ धावा कुटल्या. मिचेल स्टार्कने अंजिक्य रहाणेला बाद केलं. तर अंगकृष रघुवंशीला १ धावांवर बाद करण्यात यश आलं. कर्णधार अक्षर पटेलने त्याला बाद केलं. रघुवंशी बाद झाला, त्यावेळी केकेआरचा स्कोर ३१ धावांवर दोघे बाद झाले होते. पुढे फिन एलन आणि कॅमरुन ग्रीनने कमान सांभाळत केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. ग्रीनने दोन षटकात दोन षटकाराच्या मदतीने ३३ धावा कुटल्या.

दिल्लीच्या फलंदाजांची पडझड

दिल्ली कॅपिटल्सने टॉस हरल्यानंतर ८ विकेट गमावून १४२ धावा कुटल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात चांगली राहिली नाही. केएल राहुल आणि पथुम निसंकाने पहिली विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. राहुल २३ धावांवर खेळताना बाद झाला. कॅमेरुनने नीतीश राणाला ८ धावांवर बाद केले. पथुम निसंकाने डाव सावरला. त्याने २९ चेंडूत ५० धावा केल्या. निसंका आणि ट्रिस्टन बाद झाल्यानंतर आशुतोष शर्मा आणि अक्षर पटेलने डाव सावरला. पुढे अक्षर ११ धावा तर आशुतोष ३९ धावांवर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT