खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. भारताच्या महिला आणि पुरुषाच्या दोन्ही संघांनी शानदार विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. महिला संघाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये एकहाती विजय मिळवला. या फेरीत महिला संघाचा सामना बांगलादेशाशी होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने 93 पॉइंट्सने बांगलादेशाल पराभूत केलं. तर पुरुषांच्या संघानेह दमदार खेळ दाखव श्रीलंकेला 60 पाईंट्सने पराभूत करत सेमी फायलनचं तिकीट मिळवलं.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने शनिवारी 18 जानेवारीला आणि अंतिम सामना रविवारी १९ जानेवारीला होणारय. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या वर्ल्डकपच्या सामन्यात महिला आणि पुरुष गटाच्या भारतीय संघांने उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीपासून प्रत्येक सामना जिंकणाऱ्या भारतीय संघासमोर बांगलादेश निभाव लागला नाही. टीम इंडियाने चारही टर्ममध्ये दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने टर्न-1 मध्ये आक्रमणाने सुरुवात केली आणि पूर्ण 50 पाईंट मिळवत येथे बांगलादेशला चारमुंड्या चीत केलं.
बांगलादेशाला एकही पाईंट घेता आला नाही. दुसऱ्या टर्ममध्ये बचाव करणाऱ्या भारतीय संघाने 6 पाईंट्स मिळवले, तर आक्रमक असलेल्या बांगलादेशी संघाला फक्त 8 पाईंट्स मिळवता आली. तिसऱ्या टर्ममध्ये भारताने पुन्हा आक्रमण करत ५० पाईंट्स घेतले. अशाप्रकारे 3 टर्मनंतर स्कोअर 106-8 झालाय. येथे बांगलादेशचा पराभव निश्चित झाला पण टर्न-4 अजून बाकी होता आणि यावेळीही भारताने चांगला बचाव केला आणि 3 पाईंट मिळवले, तर बांगलादेशचे 8 पाईंट झाले. अशाप्रकारे भारताने हा सामना 109-16 असा धक्कादायक स्कोअरलाइनने जिंकला.
महिला संघाच्या अप्रतिम कामगिरीनंतर पुरुषांच्या संघानेही निराश न करत उत्तम कामगिरी केली. भारतीय संघाने भूतानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि त्याच पद्धतीने श्रीलंकेचाही पराभव केला. टीम इंडियाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला दमदार खेळ दाखवला. त्या खेळाच्या जोरावर श्रीलंकेचा 100-40 अशा मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना नेपाळशी असणार आहे. नेपाळच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.