rohit sharma And Virat Kohli saam tv
Sports

टी-२० विश्वचषकात ओपनिंग कोण करणार? कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सलामी फलंदाजीबाबत टीपण्णी केली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजच्या आधी टीम इंडियाचा कर्णधार (Rohit Sharma) रोहित शर्माने सलामी फलंदाजीबाबत टीपण्णी केली आहे. आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात (k l Rahul) के एल राहुलच ओपनिंग करणार, असं रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विराट कोहलीला (virat kohli) तिसरा सलमीवीर फलंदाज म्हणून पाहिलं जाणार आहे. (Indian Cricket Team Latest News Update)

टी-२० विश्वचषक सुरु व्हायला एक महिन्याचा अवधी आहे आणि ओपनिंग फलंदाजीवरून वादविवाद सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात २० सप्टेंबरला टी-२० सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजच्या आधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संवाद साधला. ओपनिंग फलंदाजी करण्यावरून टीम इंडियात सुरु असलेल्या चर्चांना रोहितने अखेर पूर्णविराम लावला. टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाकडून के एल राहुलच ओपनिंग करणार आहे, असं स्पष्टीकरण रोहित शर्मानं दिलं.

पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, आमच्याकडे विराट कोहली सलामीवीर फलंदाज म्हणून पर्याय आहे. कोहली आमच्यासाठी तिसरा सलामीवीर फलंदाज असेल. पण टी-२० विश्वचषकासाठी के एल राहुलच टीम इंडियासाठी ओपनिंग करणार.

राहुलच करणार ओपनिंग

विराट कोहलीने सलामीवीर फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केलीय. नुकतंच झालेल्या आशिया कपमध्ये अफगाणिस्तानच्या विरुद्ध विराट कोहलीने ओपनिंग फलंदाजी केली. त्या सामन्यात विराटने चौफेर फटकेबाजी करत नाबाद १२२ धावा करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. विराटने त्याच्या करिअरमधील ७१ वा आंतरराष्ट्रीय शतक अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात केला.

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार),केएल राहुल (उप-कर्णधार),विराट कोहली,सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर),दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या,आर.अश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT