virat kohli  saam tv
Sports

IND vs WI 2nd Test: खेळाडू असावा तर असा; विराटला भेटताच या खेळाडूच्या आईला अश्रू अनावर; मिठी मारत म्हणाली.. -VIDEO

Virat Kohli Viral Video: विराट कोहलीसोबत असं काहीतरी घडलं आहे, ज्यामुळे हा खास क्षण आणखी खास बनला आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 2nd Test Virat Kohli Viral Video: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने जोरदार शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे अनेक मोठं मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ५०० वा सामना खेळणं हा कुठल्याही क्रिकेटपटूसाठी खास क्षण असतो. मात्र विराट कोहलीसोबत असं काहीतरी घडलं आहे, ज्यामुळे हा खास क्षण आणखी खास बनला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

विराट कोहलीचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही त्याचे प्रचंड फॅन्स आहेत. नुकताच सामना झाल्यानंतर विराटने वेस्टइंडीज संघातील खेळाडूच्या आईची भेट घेतली आहे. वेस्टइंडीज संघातील यष्टीरक्षक जोशुआ डी सिल्वाची आई देखील हा सामना पाहण्यासाठी हजर होती.

त्याची आई विराट कोहलीची मोठी फॅन आहे. विराटला भेटणं हे त्याच्या आईचं स्वप्न होतं. क्वीन्स पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या सामनातून त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. विराटला भेटताच त्याच्या आईचे अश्रू अनावर झाले.

विराटची भेट घेतल्यानंतर जोशुआ डी सिल्वाच्या आईने सांगितले की, ते आणि त्यांचा मुलगा जोशुआ हे दोघेही विराट कोहलीचे मोठे फॅन आहेत. हा त्यांच्यासाठी भावुक करणारा क्षण आहे. त्यांनी असं देखील म्हटलं की, विराट आमच्या देशात येऊन खेळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तो एक महान खेळाडू आहे.' (Latest sports updates)

५०० व्या समान्यात विराटची विशेष कामगिरी...

विराट कोहलीने आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. तो ५०० व्या सामन्यात शतक झळकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे. ५०० व्या सामन्यापर्यंत सचिनने २८ शतके झळकावली होती. आता विराट कोहलीने २९ वे शतक झळकावत त्याचा हा विक्रम मोडून काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT