rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma News : रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर

Vishal Gangurde

नवी दिल्ली : टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेट फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेने अनेकांना धक्का बसला. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर आता रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहितच्या चाहत्यांना मोठी खुशखबरी दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक व्हिडिओ शेअर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या व्हिडिओमाध्यमाद्वारे संवाद साधताना विश्वचषक जिंकण्याचं श्रेय राहुल द्रविड, रोहत शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाला समर्पित केलं आहे. तसेच यावेळी डब्ल्यूटीसी फायनल आणि चँमियन्स ट्राफीमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करेल, याला दुजोरा दिला आहे.

एका वर्षात २ आयसीसी फायनलमध्ये पराभूत

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील एका वर्षात दोन आयसीसी फायनल हरलो होतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि दुसरा वनडे विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा टी२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत स्वत: रोहित शर्मा यांनी धमाकेदार फलंदाजी केली.

जय शहांनी केलं 'या' खेळाडूंचं कौतुक

टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडिया पराभूत होईल, असं वाटत असताना शेवटच्या ५ षटकात डाव फिरला. मात्र, दुसऱ्या डावाच्या शेवटच्या ५ षटकात डाव फिरला. शेवटच्या ५ षटकात जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह या सर्वांनी जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला.

तसेच या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेविड मिलचा झेल घेतला. त्याचवेळी अनेकांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावर भाष्य करत भारताच्या विजयात शेवटच्या षटकाचं मोठं योगदान असल्याचं जय शहा यांनी स्पष्ट केलं. यासाठी जय शहा यांनी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यांचं कौतुक करत आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT