jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

Jasprit Bumrah salary cut: बीसीसीआयच्या नवीन करारामुळे जसप्रीत बुमराहला २ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. A+ ग्रेड काढल्याने त्याच्या पगारात कपात झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बीसीसीआयच्या एका निर्यणयामुळे जसप्रीत बुमराहचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहला तब्बल २ कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. फेब्रुवारी महिन्यात मंडळाने भारतीय टीममधील वरिष्ठ पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी वार्षिक करार जाहीर केला. यावेळी बीसीसीआयने यामधून 'ए+' ग्रेड काढून टाकला. या नवीन करारांमध्ये केवळ तीन खेळाडू 'ए' ग्रेडमध्ये आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह त्याच्या आधीच्या करारानुसार 'ए+' ग्रेडमध्ये होता. तेव्हा त्याला वार्षिक ७ कोटी रुपये मिळत होते. 'ए+' ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये, 'ए' ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी रुपये, 'बी' ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि 'सी' ग्रेडमधील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात. दरम्यान नवीन करारानुसार, खेळाडूंना मिळणारे पैसे पगार तेच राहतील की त्यात सुधारणा केली जाणार की नाही हे बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

जर खेळाडूंना मिळणारे पैसे तेच राहणार असतील तर जसप्रीत बुमराहचे २ कोटी रुपयांचं अंदाजे नुकसान झाले आहे, कारण त्याच्या आधीच्या करारानुसार त्याचा पगार ७ कोटी रुपये होता. आता 'ए+' ग्रेड काढून टाकण्यात आला असून बुमराह 'ए' श्रेणीत आलाय. त्यामुळे त्याचा पगार ५ कोटी रुपये झाला आहे.

विराट कोहली , रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचं झालेलं डिमोशन हे समजण्यासारखं आहे. कारण ते आता टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत नाही. परंतु जसप्रीत बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, बुमराहवर अन्याय झालाय का? टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, बुमराहच्या जाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करायची यावर बीसीसीआय विचार करतंय.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, 'जसप्रीत बुमराहचं होणारं नुकसान कसं भरून काढायचं हा बीसीसीआय विचार करतेय . त्याचा पगार ७ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत कमी करणं चुकीचं ठरेल. चांगली कामगिरी करूनही इतर काही खेळाडूंनाही एक ग्रेड खाली ढकलण्यात आलंय. कराराचं मूल्यांकन बदललं जाऊ शकतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT