Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022 Latest Update SAAM TV
Sports

Jasprit Bumrah News : टी-२० वर्ल्डकपआधी भारताला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह स्पर्धेबाहेर

टी २० वर्ल्डकप स्पर्धेआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. जसप्रीत बुमराह स्पर्धेबाहेर झाला आहे.

Nandkumar Joshi

Jasprit Bumrah Latest News : मुंबई: टी -२० वर्ल्डकप स्पर्धेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्याच्या आधीच सरावादरम्यान त्याच्या पाठीच्या वेदनांनी त्रस्त होता. (Jasprit Bumrah Marathi News)

भारत आणि दक्षिण आफ्रिका (Team India) यांच्यात बुधवारी पहिला टी २० सामना झाला. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळू शकला नाही. बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, आता तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतूनही बाहेर झाला आहे. बीसीसीआयकडून बुधवारी त्याच्या दुखापतीबाबत माहिती देण्यात आली होती. मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. आता दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट आली आहे. तो टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेत जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो रिहॅब केंद्रात गेला होता. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेतही खेळला नव्हता. दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी २० मालिकेत त्याने पुनरागमन केलं होतं. या मालिकेतील केवळ दोन सामने तो खेळला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: १२ वर्षांचा संघर्ष; सतत अपयश; तरी हार नाही मानली; मेहनतीच्या जोरावर झाले SDM; राहुल सिन्हा यांचा प्रवास

Maharashtra News Live Update: राहुरी पोटनिवडणूक सस्पेन्स कायम, प्राजक्त तनपुरे आज घेणार निर्णय

Health Care: रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

इराण- अमेरिका युद्धाच्या 40 दिवसांनंतर उडणार महागाईचा भडका? अन्नधान्य दरानं गाठला 6 महिन्यांचा उच्चांक

Shikanji Recipe : घरीच साखरेशिवाय बनवा गोड शिकंजी, उन्हाळ्यात एक घोट पिताच मन होईल तृप्त

SCROLL FOR NEXT