Jasprit Bumrah form saam tv
Sports

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहमुळे मुंबईचा सलग ३ रा पराभव; आकडे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Jasprit Bumrah form: मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या खराब फॉर्मची चिंता वाढली आहे. सलग चार सामन्यांत एकही विकेट न मिळाल्याने टीम अडचणीत आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वानखेडेच्या मैदानावर आरसीबी विरूद्धचा सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्ससमोर एक मोठी चिंता उभी राहिलीये. या चिंतेचं कारण आहे टीमचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह...आयपीएलच्या १९ व्या सिझनमध्ये बुमराहची कामगिरी फारच निराशाजनक आहे. मुंबईने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत आणि चारही सामन्यांमध्ये विकेट्सच्या बाबतीत बुमराहची पाटी कोरी आहे. कधीकाळी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या बुमराहला या सिझनमध्ये अजून एकही विकेट पटकावता आलेली नाही.

रविवारी वानखेडेच्या मैदानावर आरसीबी विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने १८ रन्सने जिंकला. या सामन्यात देखील बुमराहला गोलंदाजीमध्ये महागही पडला शिवाय त्याला विकेटही काढता आली नाही. या सामन्यात बुमराहने ४ ओव्हरमध्ये ३५ रन्स दिलेत.

४ सामन्यात बुमराहला एकही विकेट नाही

गेल्या काही आयपीएल सामन्यांची आकडेवारी पाहता बुमराहची कामगिरी फारच निराशाजनक आहे. आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध त्याने 4 ओव्हरमध्ये 40 रन्स दिलेत. त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 35 रन्स दिलेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स दिलेत. तर गुवाहाटीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो पूर्ण 4 ओव्हरही टाकू शकला नाही आणि 3 ओव्हर्समध्ये 32 रन्स दिलेत.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच बुमराह सलग ४ सामन्यांत एकही विकेट घेऊ शकलेला नाही. ही बाब मुंबई इंडियन्ससाठी फारच चिंतेची बाब मानली जातेय. बुमराहने टी-20 वर 2026 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. बुमराह आणि वरुण चक्रवर्ती 14 विकेट घेतल्या होत्या.

मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव

रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला 18 रन्सने पराभूत केलं. हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 240 रन्सचा भक्कम डोंगर उभारला होता. या मोठ्या स्कोरचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगला प्रयत्न केला. पण तरीही टीमला 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 222 रन्सपर्यंतच मजल मारता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT