Jasprit Bumrah Video SAAM TV
Sports

Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराह झाला भावुक, व्हिडिओ केला शेअर; फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट

Jasprit Bumrah Video : टीम इंडियाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. स्वतः बुमराहने फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Nandkumar Joshi

Jasprit Bumrah Video : टीम इंडियाचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं बऱ्याच काळापासून टीम इंडियामधून बाहेर आहे. पुढील काही महिन्यांत होमग्राउंडवर होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बुमराह हा टीम इंडियासाठी 'ट्रम्पकार्ड' मानला जातोय. अशावेळी त्याच्या फिटनेसवर सगळ्यांच्या नजरा आहेत. आता टीम इंडियाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. स्वतः बुमराहने फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

जसप्रीत बुमराहने वनडे वर्ल्डकपच्या (Cricket World Cup) तयारीसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. लवकरच तो टीम इंडियात कमबॅक करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २९ वर्षीय बुमराह सप्टेंबर २०२२ पासून एकही सामना खेळलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो खेळू शकला नव्हता. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाला टॅग करताना आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो बेंगळुरू येथील एनसीएमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. सराव करत असताना त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. बॅकग्राउंडला गाणं वाजत आहे. मी घरी येतोय, अशा त्या ओळी आहेत.

त्यामुळे बुमराह लवकरच वापसी करणार असल्याचे संकेत त्याने स्वतः या व्हिडिओतून दिले आहेत. ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी २० मालिका होत आहे. या मालिकेद्वारे तो टीम इंडियात वापसी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्हिडिओ बघा -

टीम इंडिया व्यवस्थापनाची भूमिका काय?

जसप्रीत बुमराहच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत व्यवस्थापन कोणतीही घाई करू इच्छित नसल्याचे संकेत मिळतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. २०११ नंतर टीम इंडियानं मोठी स्पर्धा जिंकली नाही. टीम इंडियाचे अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यात रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, उमेश यादव यांच्यासह अनेक जण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन सीझन ३'साठी मनोज वाजपेयीसह बाकी कलाकारांना किती मिळालं मानधन?

Switch Board Cleaning Tips: घरातला स्विच बोर्ड काळकुट्ट झालाय? असा करा घरच्याघरी साफ, दिसेल पांढराशुभ्र

SCROLL FOR NEXT