Jasprit Bumrah Injury Update Saam Tv
Sports

Jasprit Bumrah : "तो फलंदाजी करु शकेल, पण.." जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबतची नवी अपडेट आली समोर

Jasprit Bumrah : पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुरु असताना जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या दुखापतीशी निगडीत माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Jasprit Bumrah: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरु आहे. भारतीय संघात रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची धुरा सोपावण्यात आली. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बुमराहला मैदानातून बाहेर जावे लागले. त्याच्या पाठीत दुखू लागले होते. तेव्हा पाठीच्या दुखण्यामुळे बुमराहला रुग्णालयात वैद्यकीय तपासासाठी नेण्यात आले होते. सामना सुरु असतानाच तो ड्रेसिंग रुममध्ये परतला. नुकतंच बुमराहच्या दुखापतीबाबतची अपडेट समोर आली आहे.

कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या शेवटी बुमराहने ख्वाजाला, तर दुसऱ्या दिवशी लबूशेनला बाद केले. त्याने दुसऱ्या दिवशी १० षटके देखील टाकली. खेळ सुरु असताना त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या दुखण्याबाबतची अपडेट समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, 'तिसऱ्या दिवशी बुमराह फलंदाजी करु शकेल. पण उद्या त्याला कसे वाटते यावरुन त्याच्या गोलंदाजीसंबंधित निर्णय घेतला जाईल.'

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील एकूण ९ डावांमध्ये जसप्रीत बुमराहने १३.०६ च्या सरासरीने तब्बल ३२ गडी बाद केले आहेत. या कसोटी सामन्यामध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्याने कर्णधारपद सांभाळले होते. बुमराहमुळे भारताला त्या सामन्यात विजय मिळाला. आता शेवटच्या सामन्यातही त्याच्याकडे कर्णधारपद आहे. बुमराहकडून संघाला आणि चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. दुखापतीमुळे बुमराहच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत आहेत. बुमराह भारतीय संघासाठी फार महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या संघ १८१ धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचे ६ गडी बाद केले. दुसऱ्या डावात रिषभ पंतने सर्वाधिक ६१ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी भारत १४५ धावांनी आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT