ind vs sl twitter
Sports

IND vs SL, 1st ODI: अति घाई, पॅव्हेलियनमध्ये नेई..आऊट नसतानाही बॅट्समन तंबूत परतला; जयसूर्याही भडकला- VIDEO

Janith Liyanage Wicket: श्रीलंकेचा फलंदाज जनिथ लियांगे बाद नसतानाही मैदानाबाहेर परतला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची मोहीम फतेह केल्यानंतर भारतीय संघाने मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजाकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान श्रीलंकेच्या बाजूने लागला. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून सलामीवीर पथूम निसंकाने ५६ धावांची सलामी दिली. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार चरिथ असलंकाने १४ धावा केल्या.

श्रीलंकेकडून जनिथ लियांगे सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्याने २६ चेंडूंचा सामना करत २० धावांची खेळी केली होती. तो संघाचा डाव पुढे घेऊन जात होता. त्यावेळी अक्षर पटेल गोलंदाजीला आला. अक्षर पटेल ३५ वे षटक हाताळत होता. त्यावेळी षटकातील दुसऱ्या चेंडूवर जनिथ लियांगेने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू खेळपट्टीवरील धूळ उडवत आणि केएल राहुलच्या पॅडला लागुन स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. त्यावेळी रोहित शर्मासह भारतीय संघाने जोरदार अपील केली. चेंडू रोहितच्या हातात जाताच फलंदाज जनिथ लियांगेने पॅव्हेलियनची वाट धरली. त्यामुळे अंपायरनेही त्याला बाद घोषित केलं.

मुख्य बाब म्हणजे, जनिथ लियांगे बाद नव्हताच. लियांगे बाद होऊन मैदानाबाहेर गेल्यानंतर रिप्ले दाखवण्यात आला, त्यावेळी चेंडू आणि बॅटचा कुठलाच संपर्क झाला नव्हता, असं दिसून आलं. जनिथ लियांगेला चेंडू बॅटला लागला आहे की नाही याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. हे पाहून श्रीलंकेचा प्रशिक्षक सनाथ जयसूर्याही भडकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT