england cricket team  saam tv
Sports

England Playing 11 Prediction: आता ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही! चौथ्या कसोटीत इंग्लडचा 'हा' खतरनाक खेळाडू करणार कमबॅक

James Anderson Comeback: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरू आहे.

Ankush Dhavre

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे.

मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन संघाबाहेर होता. मात्र तो चौथ्या कसोटीत कमबॅक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ओली रॉबिन्सनला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी जेम्स अँडरसन कमबॅक करणार आहे. ओली रॉबिन्सनला देखील या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. (Ashes 2023)

सुरुवातीच्या २ सामन्यात हवी तशी कामगिरी न केल्याने जेम्स अँडरसनला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. (James Anderson Comeback)

जेम्स अँडरसनची कारकीर्द..

जेम्स अँडरसन हा इंग्लंड संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने इंग्लंड संघासाठी आतापर्यंत एकूण १८१ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६८८ गडी बाद केले आहेत. तसेच वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २६९ गडी बाद केले आहेत. तर १९ टी -२० सामन्यांमध्ये त्याने १८ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates in marathi)

ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर..

अॅशेस मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी विजय मिळवला होता.

मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT