John Campbell, Cricketer  saam tv
क्रीडा

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपआधी 'या' विस्फोटक फंलंदाजावर संकट, क्रिकेटमध्ये चार वर्षांसाठी घातली बंदी

एका धाकड खेळाडूला चार वर्षांसाठी क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी 16 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याने क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोचला आहे. क्रिकेटप्रेमींसाठी वर्ल्डकप पाहणं औत्सुक्याचं असलं तरी काही खेळाडूंसाठी मात्र वर्ल्डकपआधीच वाईट बातमी समोर आली. भारताचे काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने (T20 wolrd cup) वर्ल्डकपला मुकणार आहेत. अशातच आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका धाकड खेळाडूला चार वर्षांसाठी क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या खेळाडूवर अॅंटी डोपिंग नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Anti-Doping Rule Violation latest News)

टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच एका खेळाडूवर मोठं सकंट उभं ठाकलं आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये मोठा विक्रम करणारा खेळाडू डोपिंग प्रकरणात अडकला आहे. या खेळाडूवर अॅंटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी क्रिकेटमध्ये चार वर्षांची बंदी घातली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात या खेळाडूवर अॅंटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

या विस्फोटक फंलंदाजावर घातली बंदी

जमेकाच्या अॅंटी डोपिंग आयोग (JADCO) ने वेस्टइंडिजचा खेळाडू जॉन कॅम्पबेलवर अॅंटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.तीन सदस्यांच्या टीमने एप्रिल महिन्यात किंग्स्टन येथे जॉन कॅम्पबेलवर रक्ताचा नमुणा न दिल्याने आरोप लावला होता. जॉनवर JADCO नियम 2.3 चं उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आलीय.

JADCO ने निर्णय देताना स्पष्ट म्हटलं, सबळ पुराव्यानीशी अॅंटी डोपिंग नियमांचं उल्लंघन खेळाडूने केल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे या परिस्थितीत खेळाडूला क्रिकेटमध्ये चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. जॉन कॅम्पबेलने (John Campbell) वेस्टइंडीजसाठी 20 टेस्ट, 6 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत. जॉनने टेस्टमध्ये 888 धावा,वनडेत 248 आणि टी20 मध्ये 11 धावा केल्या आहेत.

2019 मध्ये केला होता वर्ल्ड रेकॉर्ड

जॉन कॅम्पबेलने 2019 मध्ये डबलिनमध्ये आर्यलॅंडच्या विरुद्ध 179 धावांची विस्फोटक खेळी केली होती. या इनिंगमध्ये जॉनने 15 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. या सामन्यात त्याने शाई होपसोबत 365 धावांची विक्रमी भागिदारी केली होती. ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी भागिदारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT