team india Saam tv news
Sports

Ishan Kishan and Suryakumar Yadav: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीपूर्वी २ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त

Ishan Kishan and Suryakumar Yadav: रविवारी धर्मशाला येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Vishal Gangurde

Ishan Kishan and Suryakumar Yadav:

विश्वचषकात टीम इंडियाने सलग चार सामने जिंकले आहेत. चार सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया पाचवा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. आता टीम इंडियाचा पाचवा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. मात्र, रविवारी धर्मशाला येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

'आज तक'च्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखपातीमुळे संघाबाहेर पडला आहे. त्याच्यानंतर सराव करताना सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. तर ईशान किशनला मधमाशा चावल्या आहेत.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा सराव करत होता. त्यावेळी सूर्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव हा मलमपट्टी लावून सरावातून बाहेर पडला. यामुळे या दोघांना पुढील सामन्यात संघात स्थान मिळणे अवघड मानले जात आहे. मात्र, याबाबत कोणीही अधिकृत विधान केलेलं नाही.

कोच राहुल द्रविड यांनी पंड्याच्या तब्येतीबाबत अपडेट

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी राहुल द्रविडने हार्दिक पंड्याच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहेत. राहुल द्रविड म्हणाले, 'हार्दिक पंड्या हा आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या निवडीमुळे संघात समतोल साधता येतो. आम्ही चांगले ११ खेळाडू निवडण्यावर भर देऊ'.

दरम्यान, हार्दिक पंड्या बांगलादेशविरुद्ध सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. सामन्यादरम्यान हार्दिकचा पाय मुरगळला होता. या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावं लागलं होतं.

हार्दिकच्या ऐवजी संघात कोणाला संधी?

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातून बाहेर पडला आहे. यामुळे हार्दिकच्या जागी कोणाचा खेळवायचं हा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा आणि भारताच्या टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे. यामुळे पुढील सामन्यात हार्दिकच्या जागी कोणता खेळाडू सामना खेळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा ठाणे न्यायालयात जाणार

RBI चा मोठा निर्णय! मुंबईतील ५२ वर्ष जुन्या बँकेचा परवाना केला रद्द; ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

Fort In Asangaon : दाट जंगल, विशाल पठार अन् सह्याद्रीचे विहंगम दृश्य, शिवकालीन वैभव जपतोय आसनगावमधील 'हा' किल्ला

Riteish - Raja Shivaji Collection : "शिवाजी राजे म्हणायचं!"; 'राजा शिवाजी'नं दुसऱ्या मंगळवारी केली बक्कळ कमाई, रितेश देशमुखच्या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Ladki Bahin Yojana: मे महिन्याचा दुसरा आठवडा संपला पण मार्च-एप्रिलचा हप्ता नाही; लाडकीच्या खात्यात ₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT