IRE vs SA Twitter/ @Cricketireland
Sports

IRE vs SA: आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून रचला इतिहास

आयर्लंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (IRE vs SA) पराभूत करून इतिहास रचला आहे.

वृत्तसंस्था

आयर्लंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (IRE vs SA) पराभूत करून इतिहास रचला आहे. मंगळवारी (13 जुलै) डब्लिनमध्ये झालेल्या या सामन्यात आयर्लंडने 43 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव (Ireland Beat Sauth Africa) करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (IRE vs SA: Ireland made history by defeating South Africa)

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सामन्यात 5 गडी गमावून 290 धावा केल्या. यात कर्णधार अँडी बलबर्नीने शतक ठोकत 102 धावा केल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. प्रत्युत्तरादाखल 291 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 48.3 षटकांत 247 धावांत गुंडाळला गेला.

दक्षिण आप्रिकेकडून मालनने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली आहे. मालनशिवाय रॉसी व्हॅन डर ड्यूसेनने 49 धावा केल्या. या दोन फलंदाजांशिवाय कोणताही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही. ज्याचा पराभव दक्षिण आफ्रिकेला सहन करावा लागला. या विजयासह आयर्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT