सध्या किंग्स कप २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी भारत आणि इराक हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा करावा आहे.
फुलटाईम पर्यंत हा सामना २-२ च्या बरोबरीत होता. मात्र पेनल्टी शूट आऊटमध्ये इराकने बाजी मारली. या पराभवासह भारतीय संघाचं किंग्स कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचं स्वप्नं धुळीस मिळालं आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीलाच भारतीय संघाकडून नाओरेम महेशने गोल केला आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इराकने गोल करत सामना बरोबरीत आणला.
दुसऱ्या हाल्फमध्ये मनवीर सिंगने संघासाठी दुसरा गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र सामन्याच्या शेवटच्या क्षणी इराकला पेनल्टी शूट आऊट मिळालं. ज्यात गोल करत इराकने हा सामना बरोबरीत आणला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव..
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघाला एका गोलमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ गोल केले. तर इराकने ५ गोल करत भारतीय संघावर विजय मिळवला. (Latest sports updates)
संपूर्ण सामन्यात तोडीस तोड खेळ करणाऱ्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये केवळ १ गोलमुळे बाहेर पडावं लागलं आहे.
भारतीय संघाने जर इराकला पराभूत केलं असतं तर हा भारतीय संघाचा मोठा विजय झाला असता कारण इराकचा संघ फिफा रँकिंगमध्ये भारतीय संघापेक्षा २९ पावलं पुढे आहे. इराकच्या संघाने नुकताज अरेबियन गल्फ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.