रोहित कदम, साम टीव्ही
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघासोबत एक भयावह घटना घडली. अहमदाबादमधील अंतिम सामना खेळून नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसला अचानक आग लागली. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलरसह सर्व खेळाडू बसमध्येच होते. त्यामुळे गुजरात टायटन्सचे सर्व खेळाडू थोडक्यात बचावले. दरम्यान, गुजरात टायटन्स संघासोबत नेमकं काय घडलंय? पाहूयात...
IPLफायनलनंतर गुजरात टायटन्सची टीम बसमधून रवाना झाली. स्टेडियमवरून हॉटेलकडे जाताना बसमध्ये आग लागली. या बसमध्ये गिल, बटलरसह सर्व खेळाडू होते. गुजरात टायटन्सच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून खेळाडू वेळेत बाहेर पडल्यामुळे दुर्घटना टळली.
या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. मात्र, बसला आग लागल्यानंतर दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत सर्व खेळाडू तासभर अडकून पडले. इतकंच नव्हे तर मोहम्मद सिराजनंही रस्त्यावर बसलेला स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यामुळे अंतिम सामन्यात पराभव पदरी पडलेल्या गुजरात टायटन्सससाठी ती रात्र भयावह ठरली. इतकंच नव्हे तर अंतिम सामन्यापूर्वी खराब हवामानामुळे अहमदाबादेत संघाच्या आगमानातही विलंब झाला होता. त्यामुळे अंतिम सामन्यातील पराभवापेक्षा संघाची उडालेली तारांबळच अधिक चर्चेचा विषय ठरलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.