पंजाब किंग्सा तिसरा मोठा झटका बसला आहे. पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर तंबूत परतला आहे.
पंजाब किंग्सचा दुसरा गडी बाद झाला. प्रियांशनंतर प्रभसिमरन तंबूत परतला
पंजाब किंग्सला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर प्रियांश बाद झाला.
फिल सॉल्टनंतर तिसऱ्या क्रमावर खेळण्यासाठी मयंक अग्रवाल आला. त्याने अर्शदीप सिंहने फेकलेल्या यॉर्करवर दमदार षटकार मारला.
बंगळुरूला पहिला धक्का बसला आहे. फिल सॉल्ट आउट होऊन माघारी परतला आहे. श्रेयस अय्यरने सॉल्टची कॅच पकडली.
पंजाबकडून अर्शदीप सिंह गोलंदाजी करण्यासाठी आला. फिल सॉल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये ६,२,४ अशा प्रकारे १२ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ -
विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), मयंक अगरवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड,
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, रसिख डार, मनोज भांडगे, टिम सायफर्ट, स्वप्नील सिंह
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह, अझमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर पर्याय : हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंह, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, प्रवीण दुबे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या फायनल सामन्यापूर्वीच्या ओपनिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतीय सैन्याला अभिवादन करण्यात आले आहे. या सेरेमनीला शंकर महादेवन, शिवम महादेवन यांसारख्या कलाकारांनी सादरीकरण केले आहे.
आयपीएलची फायनल आज मंगळवारी रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना होत आहे. यंदा आयपीएलला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे. १८ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी कधीही जेतेपदाला गवसणी घातलेली नाही. त्यामुळे ही दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.