IPL 2027 Saam Tv
Sports

IPL 2027 आधी संघांमध्ये मोठी अदलाबदल; हार्दिक पंजाबकडून खेळणार, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात!

IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये मोठा ट्रेड झाला आहे. हार्दिक पांड्या पंजाबमध्ये, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे.

Shruti Vilas Kadam

IPL 2027: आयपीएल २०२७ च्यापूर्वी क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळाडूंची मोठी अदलाबदल झाली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सकडून खेळणार आहे, तर भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. या दोन्ही खेळाडूंच्या फ्रँचायझी बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या ट्रेडमुळे आयपीएल २०२७ च्या आधी दोन्ही संघांच्या रणनीतीत मोठे बदल होणार आहेत.

हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला!

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१५ पासून सात हंगाम मुंबईकडून खेळल्यानंतर २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला. गुजरातने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले आणि पहिल्याच हंगामात त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले. यानंतर २०२४ मध्ये हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. आता त्याचा मुंबईसोबतचा दुसरा कार्यकाळ संपला आहे. हार्दिकने आतापर्यंत १६२ आयपीएल सामने खेळले असून, २,९५५ धावा आणि ८२ विकेट घेतले आहेत.

अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

दुसरीकडे, अर्शदीप सिंग आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. २०१९ मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने आठ वर्ष संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने आतापर्यंत ९६ सामन्यांत १११ विकेट घेतले आहेत. पंजाब किंग्सच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. २०२५ च्या आयपीएल हंगामात त्याने २१, तर २०२६ मध्ये १४ विकेट घेतले होते. नवीन चेंडूने विकेट मिळवणे आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करणे ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला त्याच्यामुळे मोठी ताकद मिळू शकते.

हार्दिक आणि अर्शदीपला किती मिळणार मानधन?

या मोठ्या ट्रेडमध्ये हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडून १८ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. यापूर्वी त्याचे मानधन १६.३५ कोटी रुपये होते. तर अर्शदीप सिंगला मुंबई इंडियन्सकडून १८ कोटी रुपये मिळणार आहेत.

दोन्ही संघांचे भावूक निरोप संदेश

हार्दिकच्या निरोपानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास संदेश शेअर केला. 'ब्लू अँड गोल्ड' जर्सीचे अभिमानाने प्रतिनिधित्व केल्याबद्दल धन्यवाद तुझ्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. तर, पंजाब किंग्सने अर्शदीपसाठी भावूक संदेश लिहिला. 'एका तरुण सिंहापासून पंजाबचा अभिमान ठरण्यापर्यंतचा प्रवास... हे नेहमीच तुझे घर असेल,' अशा शब्दांत त्याला निरोप देण्यात आला. या मोठ्या अदलाबदलीमुळे आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सचे संघ कसे खेळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फटाक्यांच्या वादातून तामसईमध्ये कुटुंबाला बेदम मारहाण; लाकडी दांडक्याने हल्ला

HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार?

Mumbai Crime: मुंबई हादरली! कुर्ल्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

PM Kisan Voter ID : शेतकरी आणि पेन्शनधारकांनो लक्ष द्या! PM Kisan च्या पैशांसाठी नवीन नियम येणार

भाऊबीजेला बहिण भावाला नारळ आणि करगोटा का देते?

SCROLL FOR NEXT