आयपीएलच्या मागच्या पर्वात प्रचंड चर्चेत असलेला हार्दिक पंड्या अलीकडच्या सर्वात मोठ्या ट्रेडमध्ये पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला आणि पुन्हा कॅप्टन कोण, अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली. पण त्याचं उत्तर स्वतः हार्दिकनेच दिलं आहे. २०२२ पासून आयपीएलमध्ये संघाचं कर्णधारपद भूषवणारा हार्दिक यंदाच्या मोसमात कर्णधार नसेल.
आयपीएल २०२७ च्या आधीच सर्वात मोठा ट्रेड पाहायला मिळाला. हार्दिक आता पंजाब किंग्स संघातून खेळणार आहे. दुसरीकडे पंजाबचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गेलाय. हार्दिकची पंजाबमध्ये एन्ट्री होताच कर्णधार कोण असेल याची चर्चा सुरू झाली होती. पण याचं उत्तर आता क्रिकेट चाहत्यांना मिळालं आहे. पंजाबनं पुढच्या पर्वासाठी कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे.
हार्दिकबाबत पंजाबनं एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. हार्दिक पंजाबच्या जर्सीत दिसतोय. तर पुढच्या सीझनच्या कर्णधाराचं नावही उघड झालंय. माझा कॅप्टन - श्रेयस. माझा प्रशिक्षक - रिकी. माझी टीम - संपूर्ण पंजाब. मी तुमच्या पाठिशी उभा आहे, असं त्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
श्रेयस अय्यरच कॅप्टन
हार्दिकची एन्ट्री झाली असली तरी श्रेयस अय्यर पंजाबचा कर्णधार असेल. २०२२ नंतर पहिल्यांदाच हार्दिक आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. याआधी हार्दिक गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये गेला होता, तेव्हा तो कर्णधार म्हणून खेळला होता.
श्रेयस अय्यरला पंजाबने २०२५ च्या आयपीएल मेगा लिलावात खरेदी केलं होतं. त्याच्याकडे कर्णधारपद दिलं होतं. २०२५ आणि २०२६ मध्ये त्यानं कर्णधारपद भूषवलं. त्याच्या नेतृत्वात पंजाबने २०२५ मध्ये प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं होतं. तर संघानं फायनलपर्यंत मजलही मारली होती.
श्रेयस अय्यर सध्या टीम इंडियाचा महत्वाचा भाग आहे. आयपीएलमध्येही आता त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. तो आतापर्यंत १४७ सामने खेळलाय. त्यातील १४५ डावांत त्यानं ३५. ८३ च्या सरासरीनं आणि १३६.७२ च्या स्ट्राइक रेटनं ४२२९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. १०१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.