RCB IPL records  RCB
Sports

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

RCB vs GT, IPL 2026 update : आयपीएल 2026 मध्ये आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. साई सुदर्शनच्या शानदार शतकामुळे आरसीबीविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावली गेली आहेत.

Namdeo Kumbhar

RCB IPL records list all time : आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने झळकावलेल्या धडाकेबाज शतकामुळे आरसीबीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. साई सुदर्शन याने आरसीबीच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. आयपीएलमध्ये आरसीबीविरोधात सर्वाधिक शतकांची नोंद झाली आहे. सर्वाधिक शतके करून देण्यात आरसीबी अव्वल स्थानावर पोहचली आहे.

आरसीबीच्या गोलंदाजांना आज साई सुदर्शनला रोखण्यात अपयश आले. सुदर्शनने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत शानदार शतक ठोकले. या शतकामुळे आरसीबीच्या विरोधात आयपीएल इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक शतके झळकावली गेली आहेत. हा तो 'नकोसा विक्रम' आहे. आयपीएलच्या इतिहासात आरसीबी हा असा संघ बनलाय, त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी फलंदाजांनी सर्वाधिक वेळा शतकी खेळी केली आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकात्याच्या नावावर होता. पण साई सुदर्शनच्या खेळीनंतर आरसीबी पहिल्या स्थानावर पोहचली आहे.

कोणत्या संघाने सर्वाधिक शतके दिली -

आरसीबी - १५ शतके

कोलकाता - १४ शतके

मुंबई - १४ शतके

चेन्नई - ११ शतके

राजस्थान-पंजाब - प्रत्येकी १० शतके

साई सुदर्शनने गेलचा विक्रम मोडला -

साई सुदर्शन आयपीएलमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. त्याने हा टप्पा अवघ्या ४७ डावांत गाठला. याआधी हा विक्रम दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या (४८ डाव) नावावर होता. या सामन्यापूर्वी त्याला ७२ धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली.

साई सुदर्शनचे झंझावती शतक -

सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकांत ५ बाद २०५ धावा उभारल्या. आरसीबीच्या गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकांत (डेथ ओव्हर्स) चांगला अंकुश ठेवल्यामुळे गुजरातला २३०-२४० पर्यंत पोहोचण्यापासून रोखता आले. साई सुदर्शन याने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ षटकार आणि ११ चौकार ठोकले. तर गिल याने ३२ आणि बटलने २५ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात होल्डरने २ षटकारांसह २३ धावा वसूल केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

SCROLL FOR NEXT