Sports

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

RCB Confirm Qualifed IPL 2026 Playoff : आयपीएल २०२६ मध्ये १३ पैकी ९ सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबीचा गट फेरीतील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल.

Bharat Jadhav

  • आरसीबी IPL 2026 प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला.

  • पंजाब किंग्सवर २३ धावांनी विजय मिळवत आरसीबीने स्थान निश्चित केले.

  • पंजाबला सलग सहावा पराभव पत्करावा लागला.

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. रविवारी धरमशाला येथे पंजाब किंग्सला २३ धावांनी पराभूत करून आरसीबीने अव्वल चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले. सलग सहा पराभवांमुळे पंजाब किंग्सच्या अडचणी वाढल्या आहेत. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचे भवितव्य त्यांच्या हातात नाहीये.

पंजाब किंग्सने आपला शेवटचा सामना जिंकला तर ते गट फेरी १५ गुणांसह पूर्ण करतील. प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरिता हे गुण पुरेसे असतील का, आणि उर्वरित तीन प्लेऑफ जागा कोण जिंकेल? चला सविस्तरपणे जाणून घेऊया.

आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान निश्चित

आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी ९ सामने जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. आरसीबीचा गट फेरीतील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. आरसीबी गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर राहण्याची दाट शक्यता आहे. पंजाब किंग्सच्या पराभवामुळे श्रेयस अय्यरचं टेन्शन वाढले आहे, पण पंजाबच्या पराभवामुळे दोन संघांना फायदा झाला आहे.

आरसीबीच्या विजयामुळे सीएसके आणि आरआरची चांदी

आरसीबीविरुद्ध पंजाब किंग्सच्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी समीकरण सोपे झाले आहे. विशेषतः सीएसकेला मोठा फायदा झाला आहे. चेन्नईकडे सध्या १२ गुण असून उर्वरित दोन सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. दुसरीकडे, पंजाब किंग्स आपला शेवटचा सामना जिंकूनही केवळ १५ गुणांपर्यंतच पोहोचू शकेल. यामुळेच अव्वल चार संघांमधील लढतीत पंजाब किंग्स आता मागे पडला आहे, तर सीएसकेला एक संधी मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT