IPL 2026 latest points table saam tv
Sports

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर घसरण, पहिल्या नंबरवर कोण?

IPL 2026 latest points table: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर मोठा विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. यामध्ये सीएसकेला मोठा धक्का बसला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल 2026 ला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सने पहिला सामना जिंकला. तर सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय.

आयपीएलच्या पॉईंट्सटेबलमध्ये मोठा उलटफेर

आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत तीन खेळले गेले आहेत. यात तीन टीम्सने विजय मिळवला आहे तर तीन संघांना पराभव स्वीकारावा लागला आहे. अजून काही टीम्सने आपले सामने खेळलेले नाहीत. दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

राजस्थान रॉयल्सचा मोठा विजय

सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने एकतर्फी विजय मिळवला. तर चेन्नईला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

राजस्थानसमोर चेन्नईचे फलंदाज ढेपाळले

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. यावेळी संपूर्ण टीम 20 ओव्हर्स देखील खेळू शकली नाही. सीएसके 19.4 ओव्हर्समध्ये 127 रन्सवर गारद झाली. सुरुवातीला टीमची अवस्था खूपच बिकट होती आणि 100 रन्सपर्यंत पोहोचणंही अवघड वाटत होतं. मात्र शेवटच्या टप्प्यात जिमी ओव्हरटनने उत्तम खेळी करत टीमचा स्कोर 127 पर्यंत नेला.

राजस्थानचा सहज विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने अतिशय आक्रमक खेळ केला. त्यांनी केवळ 12.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 128 रन्स करत सामना जिंकला. या मोठ्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेटही वाढला आहे.

पॉईंट्सटेबलमध्ये राजस्थान अव्वल

या विजयामुळे राजस्थान रॉयल्स थेट पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलीये. त्यांचा नेट रन रेट 4.171 इतका आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेली आरसीबी आता दुसऱ्या स्थानावर घसरलीये. त्यांच्या खात्यातही 2 पॉईंटस आहेत, पण नेट रन रेट 2.907 आहे.

मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी

सध्या तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. त्यांनी एक सामना जिंकला असून त्यांचं नेट रन रेट 0.687 आहे. तर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा पराभव झाला असून ते पॉईंट्स टेबलमध्ये खालच्या स्थानावर आहेत. यावेळी ५ वेळा विजेती टीम चेन्नई सुपर किंग्ज थेट सहाव्या स्थानावर आहे.

आज पंजाब विरुद्ध गुजरात

आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघडकीस

शरद पवार मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

Thane-Borivali Road: ठाण्यावरून बोरिवलीला जा सुसाट, दीड तासांचा प्रवास फक्त १८ मिनिटांत; कसा आहे सरकारचा गेमचेंजर प्लान?

Pahalgam Attack: वर्षभरापूर्वी पर्यटकांच्या हत्या; पहलगामची परिस्थिती सध्या कशी आहे?

Cyber Fraud: २५०० कोटींचा सायबर फ्रॉड, बँकेच्या ३ अधिकाऱ्यांसह २० जणांना अटक

SCROLL FOR NEXT