Mumbai Indians saam tv
Sports

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

IPL : आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. तर पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर झाला आहे.

Vishal Gangurde

आयपीएल स्पर्धेत दोन संघाचं आव्हान संपुष्टात

मुंबई आणि लखनौचं आव्हान संपुष्टात

आरसीबी पोहोचली गुण तालिकेत पहिल्या स्थानावर

आयपीएल २०२६ मध्ये १० मे रोजी खेळण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला इंडियन्सला २ गडी राखून पराभूत केलं. शेवटच्या चेंडूपर्यंत अतितटीचा सामना ठरला. या सामन्यात आरसीबीने बाजी मारली. या विजयानंतर आरसीबी गुण तालिकेत पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबादला दणका देत पहिल्या स्थानावर पोहोचलं.

मुंबई इंडियन्सचा पराभव करत आरसीबी ४ स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर पोहोचली. आजच्या सामन्यामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला. तर पराभवानंतर मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली. या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचं आव्हानही संपुष्टात आलं.

आजच्या सामन्याआधी आरसीबी चौथ्या स्थानावर होती. मुंबई इंडियन्सला रविवारी धूळ चारून १४ गुणासोबत पहिल्या स्थानावर पोहोचली. तर १४ गुणासहित दुसऱ्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद पोहोचली आहे. गुजरात तिसऱ्या स्थानावर तर पंजाब चौथ्या स्थानावर पोहोचली. चेन्नई सुपर किंग्स १२ गुणासहित पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

राजस्थान संघ १२ गुणासहित सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआर संघ ९ गुणासह सातव्या क्रमांकावर पोहोचला. दिल्ली ८ गुणासह आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स ६ गुणासह ९ व्या स्थानावर आहे. तर लखनौच्या संघाकडेही ६ गुण आहेत. आजच्या सामन्यात मुंबई आणि लखनौ संघा अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर गेले.

आरसीबीने मुंबई इंडियन्सचा किती गडी राखून धूळ चारली?

आरसीबी संघाने मुंबई इंडियन्सचा २ गडी राखून पराभव केला.

मुंबई विरोधातील विजयानंतर आरसीबी कोणत्या स्थानावर पोहोचली?

मुंबईचा पराभव करत आरसीबी थेट चौथ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT