आयपीएल २०२६ चा ३० वा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतोय. गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडिन्यसची सुरुवात खूपच खराब राहिली.
मात्र चौथ्या विकेटसाठी मैदानात उतरलेल्या तिलक वर्माने तुफान फलंदाजी केली. तिलक वर्माने एकाच षटकात २६ धावा ठोकून काढल्या. त्यामुळे तिलक वर्मा हा गुजरातच्या संघासाठी कर्दनकाळ ठरला. मुंबईच्या संघाने २० षटकांत पाच गडी गमावून १९९ धावा केल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून तिलक वर्माने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. तिलक १०१ धावांवर नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली. मागील सामन्यात शतक झळकावणारा क्विंटन डी कॉक या डावात १३ धावांवर बाद झाला. पदार्पण करणाऱ्या दानिशलाही केवळ २ धावा करता आल्या. इतकेच नाही तर सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही आणि तो केवळ १५ धावाच करू शकला. मात्र, तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.
तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डावाची १८ वे षटक चालू असताना तिलक वर्माने २६ धावा ठोकून काढल्या. अशोक शर्माने १८ वे षटक टाकले. तिलक वर्माने शर्माची चांगलीच धुलाई केली. या षटकात एकूण २६ धावा मुंबईला मिळाल्या. या षटकात तिलक वर्माने अशोकवर हल्ला चढवला. तिलकने या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. तशीच फटकेबाजी चालू ठेवत तिलक वर्माने आपल्या आयपीएल करिअरमधील पहिलं वहिलं शतक पूर्ण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.